3 TIMES NATIONAL LEVEL FICTION WRITING COMPETITION WINNER + BEST BLOGGER AND TOP SOLO TRAVELER IN INDIA+ 35,000 READERS + 700 FB LIKES

Saturday, August 3, 2013

चिंटु-एक सखा!!

आज शनिवार, Hitavada मध्ये Twinkle Star म्हणुन एक छोटीशी पुस्तक येते। मला ती वाचायची सवय खुप आधीपासुन, हौशिने वाचायचो। ती घ्यायला आज पाइ-पाइ राजापेठ चौकात पोहोचलो, “Hitvada आहे का काका? असेल त द्या।” मी त्यांना बोललो। त्यांनी थोडी तपासणी केली आणि नकारार्थी उत्तर दिले, “आज इंग्रजी paper संपले। मराठी पेपर आहे”। मी विचार केला ‘मराठी पेपर मध्ये काय भेटणार; तेच राजकारण, खुन, बलात्कार, चोरी, paid news आणि लाचखोरीच्या बातम्या।’ वर्तुन चिल्लरचे वांदे। आज तो खाली हाथ ही जाना होंगा मूझे।
पण माझ लक्ष अचानक वेधले ‘सकाळ’ ने। आठवले ते बालपण; एकदम।
जेव्हा हातात सकाळ पेपर; किती पण उशिरा आला तरी चालणार होते। पण शाळेत जायचा आधी शेवटचा पानावर येणारी ‘क्रिडा’ पुरवणी वाचायचो। आणि त्यात पेशावरला आदल्या दिवशी झालेल्या भारत वि पाकिस्तान कसोटी ची headlines-

‘सचिन परत दुर्दैवरीत्या बाद’
पेशावर- फलंदाज सचिनला आज परत एका चुकीचा निर्णयाचे बळी पडावे लागले। सचिनने सुरुवातिला सावध खेळी केली। शोएबने टाकलेल्या गेंदवर सचिनच्या बँटची कड घेतलेला चेंडु यष्टीरक्षक अक्मल च्या गुडघ्याला लागुन उडाला आणि स्लिप मध्ये तो टिपला गेला। रिप्लाय मध्ये चेंडु बँटला लागल्याचे आणि झेलही वैध नसल्याचे स्पश्ट झाले। पण सचिन नेहमी प्रमाणे काही नाराजगी व्यक्त न करता खेळादू व्रूत्तीने पवेलियन परतला।

झालं, दिवस गेला खड्यात। पुर्ण mood हिरावला। पण बाजुला अचानक एक नवीन गोष्ट दिसली- ‘चिंटु’। त्याआधी नव्हती पाहिलेल तसे काही। पप्पांनी 2-4 दिवस आधीच ‘सकाळ’ लावला होता। पहिल्यांदाच आले आसावे। अजुनही 2 मिनट होते। आईचा ओरडा यायचा आधी वाचुन घेऊ।

चिंटु- छे! या श्रावण महिन्यात फारच सण येतात।
मिनी-पण या सणांमुळे तुला सुट्या मिळतात ना!
चिंटु-हो, ते खर आहे। पण लगेच या सणांचि माहीती शाळेत लिहुन आणायला सांगतात ना।

मला जाम हसायला आले ते वाचुन। वाटले बस हाच आपला खरा साथी। एकदम आपल्या सारखा, dick-to copy-cat। मग कळले की ‘चिंटु’ माझ्या भेटीला रोज येणार आहे। मग रोज paperची वाट पाहु लागलो, रोज चिंटुचे किस्से; शाळेत गेलो कि मित्रांना वर्णून सांगायचो। सकाळी वाचून हसलो तरी ते परत मित्रांना सांगितल्यावर अजून हसू यायचे। खुप आनंद यायचा।
एक किस्सा मला सांगावासा वाटत आहे। शाळेत 7वी अ मध्ये असतांना मला एकदा चिंटु वाचायला नव्हते भेटले सकाळी। त मी त्या दिवशीचा paper शाळेत नेला होता। Madam वर्गात नव्हत्या तेव्हा एकदम गुप-चुप पणे paper उघडला आणि वाचु लागलो हळू आवाजात। आजू-बाजूला मित्रांची टोळी एकत होतीच। पण तेव्हड्यात madam वर्गात शिरल्या आणि हड-बडीत त्याचा crunching आवाज झाला आणि पकडल्या गेलो। माझी तक्रार सरळ आई कडे आणि घरी जाऊन बंम धबूक्के खाले पपांच्या हाताचे। कधी नाही वीसरणार तो दिवस। तेव्हा पासून चिंटु अजून जवळचा मित्र झाला।
एवढे सगळे डोक्यात सुरू असतांना पोहोचलो roomवर। 6-7 वर्षांआधी जशी उत्सुकता रहायची, त्याच उत्सुकतेने आज शेवटचे पान उघडले।
क्रिडा पान त तसेच होते, पण चिंटु चा काही अता-पता नव्ह्ता। प्रादेशीक पुरवणी हुंडाळली, पूर्ण paper उलथा-पालथा केला; पण जे पाहिजे ते भेटलेच नाही। माझा एक मित्र हरवला होता। केव्हा? कधी? कसा? माहिती नाही। कदाचित कधी कळणार पण नाही।
पण एक नवीन गोष्ट हाती लागली-बालमित्र! बालमित्र ची सवय व्हायला थोडा वेळ लागेल सही, पण चिंटु ची जागा कधी नाही जाणार। आजची मूले किती पण Calvin and Holbes किंव्हा Garfieldची cartoon strips पाहुन हसतील। पण चिंटु वाचून जे खद-खदून हसू येते ते कदाचित नाही येणार। चिंटु साठी एक छोटेसे घर बनले आहे मनात।
चिंटु आमच्यासाठी एक सखा होता आणि सदैव राहील। आमचा सारखाच; भांडणारा, मस्ती करणारा, शाळेत न जाणारा आणि सगळ्यांना हसवणारा।
-    -   -
Chintoo character is created by Charuhas Pandit and Prabhakar Wadekar. Of which Prabhaker Wadekar is no more in-between us because he sadly demised on 15th June, 2013 at the age of 56. The reason behind end of ‘Chintoo’ cartoon strip as well!
Some facts about Chintoo that I came across-
Ø  Chintoo was created on 21st November, 1991
Ø  Chintoo was part of a Marathi daily Sakal Newspaper and for a couple of years it appeared in Laoksatta as well; another Marathi daily
Ø  Chintoo-the only cartoon strip in Marathi featured 5000 strips for over 22 years
Ø  30 books being published by Purandare Prakshan on Chintoo
Ø  Two films are made on ‘Chintoo’ character. Second part going on the floor this year.
Ø  Android application developed on Chintoo-
https://play.google.com/store/apps/details?id=com.Charuhas_Pandit.chintoo
Ø  Apple application developed on Chintoo-
https://itunes.apple.com/us/app/chintoo/id634322377?mt=8

All Chintoo cartoon strip is copyrighted by their respective owner. Under any breach of act please contact me at sanketthodge@gmail.com

Visit blogadda.com to discover Indian blogs

Like this blog?
Please subscribe through your e-mail on the top-left and like my blog's Facebook page on the top - right. Else CLICK HERE
Want to read more? CLICK HERE to read all blogs in categorized version.

Keywords: 21 nov 1991, cartoon strip, charuhas pandit, chintoo, hitivada, loksatta, prabhakar wadekar, sakal, twinkle star, cartoon strip, sakal daily, loksatta daily, google play, apple
widgets
0 Comments
Disqus
Fb Comments
Comments :

No comments:

Post a Comment